
मुंबई : शहरी नक्षलवाद्यांच्या अजेंड्याच्या मागे लागून महाविकास आघाडीने कितीही प्रयत्न केले तरी हिंदुत्वाचे प्रतिक असलेला सार्वजनिक गणेशोत्सवाची पंरपरा भाजपा कधीच खंडित होऊ देणार नाही. पीओपीमुर्तीवरील बंदी उठली असून आता मोठया गणेश मुर्त्यांच्या समुद्रातील विसर्जनाबाबतही शासन ३० तारखेपर्यंत आपली भूमिका न्यायालयात मांडेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.