'आता बसा रडत...' आशिष शेलार कोणाला म्हणाले?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आल्याने आव्हाड भावूक झाले होते. त्यामुळेच शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाडांचा ट्विटरवर खरपूस समाचार घेतला आहे. 

मुंबई : मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आल्याने आव्हाड भावूक झाले होते. त्यामुळेच शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाडांचा ट्विटरवर खरपूस समाचार घेतला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज भरायला जाताना स्वतः गाडी चालविली अन् शरद पवार त्यांच्या शेजारी बसले होते. आपला उमेदवारी अर्ज भरताना खुद्द पवार आल्यामुळे आव्हाड भावूक झाले. त्याच्या बातम्याही झाल्या. 

त्याचा समाचार शेलार यांनी ट्विटद्वारे घेतला अन आव्हाडांना रडत बसण्याचा सल्ला दिला. अन त्याच वेळी बारामती, कसबा, वरळी, कोथरूडमधून युतीने कसे सक्षम उमेदवार दिले आहेत, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Shelar taunts Jitendra Awhad on twitter for being emotional while filing nomination for Maharashtra Vidhan Sabha elections