चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती : अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

मुंबई : भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्याची अधोगती झाली असून, विद्यमान सरकारने राज्याच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. त्यामुळे राज्याच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल, अशी जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. 

चव्हाण यांनी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यापासून 13 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग व्यापार मोठ्या संकटात सापडला आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून समाजात जातीय तेढ निर्माण केले जात आहे. केंद्रातले आणि राज्यातले सरकार जनतेच्या भल्यासाठी काम करण्याऐवजी दोन-चार उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करत आहेत. कामगार कायदे बदलून कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. 

या वेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार भाई जगताप, कॉंग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील, रमेश शेट्टी, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा , सचिव राजाराम देशमुख, मनीष गणोरे, प्रदेश कॉंग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस संजय तायडे पाटील यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: Ashok Chavan criticizes BJP Government in Maharashtra