'विद्यार्थ्यांचे शिक्षणिक वर्ष वाया जाऊ नये'; मराठा आरक्षणावर अशोक चव्हाणांचे महत्वाचे विधान

तुषार सोनवणे
Monday, 2 November 2020

राज्यात कोरोना संसर्गामुळे आधीच शैक्षणिक वर्ष उशीराने सुरू होत आहे. परंतु शैक्षणिक प्रवेश मराठा आरक्षणला स्थगिती मिळाल्याने थांबले आहेत.

मुंबई - राज्यात कोरोना संसर्गामुळे आधीच शैक्षणिक वर्ष उशीराने सुरू होत आहे. परंतु शैक्षणिक प्रवेश मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने थांबले आहेत. त्यामुळे शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया तत्काळ पूर्ण कराव्यात असे माझे वयक्तीक मत आहे असे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

विविध मागण्यांसाठी राज्यातील 1300 डॉक्‍टर संपावर! आंदोलन करत सरकारचा निषेध

राज्यातील विद्यार्थ्यांचे विविध टप्प्यातील शैक्षणिक प्रवेश मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे रखडले आहेत. त्यामुळे गेल्या वेळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आजची कायदेशीर परिस्थिती लक्षात घेऊन शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लवकर पार पाडाव्यात असे मी, मंत्री उदय सामंत, मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्याना सांगितले आहे. असे अशोक चव्हाण म्हणाले. ही प्रक्रीया उशीर न लावता तत्काळ व्हायला हवे, कारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा हा प्रश्न आहे. आधीच 4 ते 5 महिणे निघून गेली आहेत.उर्वरित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर आहे. त्यामुळे अकरावी सह अन्य सर्व शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यात याव्यात यासंबधी सरकारी स्थरावर निर्णय व्हावा अशी विनंती चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील अशी आशा चव्हाण यांनी व्यक्त केली.

आधी सरकारशी हात जोडून बोलू, नाहीतर मग हात सोडून बोलू; राज ठाकरेंचा इशारा

राज्यातील काही राजकीय पक्ष मराठा आरक्षणावरून ओबीसी विरूद्ध मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे षडयंत्र जनतेने हानून पाडायला हवे. आंदोलकांमध्ये राजकीय कार्यकर्त्यांचा धूडगूस दिसून येत आहे. त्यामुळे प्रामाणिक आंदोलनकर्त्यांना यापासून सावध रहावं असंही चव्हाण यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, मराठा आरक्षणाप्रकरणी लवकर सुनावणी घेण्यासाठी तसेच खंडपीठाच्या स्थापनेसाठी राज्य सरकारने तीसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयात ्रअ्रर्ज केला असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavans advice to the Chief Minister on eleventh standard education