

ठाणे : घराणेशाहीविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पेटवलेली ठिणगी आता थेट खासदार नरेश म्हस्के यांच्या दारापर्यंत पोहोचली आहे. ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार होण्यापूर्वी नगरसेवक म्हणून ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व नरेश म्हस्के करीत होते, त्या प्रभागातून त्यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र याला शिंदे गटातूनच उघड विरोध होऊ लागल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे.