

BJP
esakal
उल्हासनगर : उल्हासनगर शहर भाजपमध्ये मोठी बंडखोरी उसळली आहे. १५ वर्षांपासून पक्षाशी निष्ठेने कार्य करणाऱ्या जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी मढवी यांनी पक्षातील गैरप्रकार आणि ठेकेदारशाहीचा आरोप करत भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्यावर ठेकेदारांना पदे वाटप करून पक्षाला गर्तेत नेण्याचा आरोप केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अश्विनी मढवी यांनी पत्रकार परिषदेत उघडपणे वधारिया यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत टीम ओमी कलानीमध्ये प्रवेश घेतल्याची घोषणा केली आहे.