

Asiatic Society Election
ESakal
मुंबई : एशियाटिक सोसायटीतील व्यवस्थापन समितीच्या निवडणुका अखेर लांबणीवर पडल्या आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसाठी शनिवारी (ता. ८) मतदान होणार होते. धर्मादाय आयुक्तांचे आदेश रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नियोजित निवडणूक सर्वानुमते पुढे ढकलण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापन समितीने दिली.