

Asiatic Society Election
ESakal
मुंबई : मुंबईचे ग्रंथवैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी २० डिसेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी ८ नोव्हेंबरला मतदान होणार होते; मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ते पुढे ढकलण्यात आले. २१ नोव्हेंबरपर्यंत सदस्य शुल्क भरलेल्या अर्जदारांनाच मतदानाचा हक्क मिळेल, असे एशियाटिकच्या अध्यक्षा प्रा. विस्पी बालापोरिया यांनी स्पष्ट केले. यावरुन वेगळाच वाद उफाळण्याची शक्यता आहे.