तुम्हीच सांगा आम्ही जगायचे कसे?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

मुंबई : पगार वेळेवर मिळत नाही, त्यात महागाईची भर; घरखर्च चालवण्यासाठी कर्ज काढावे लागते. ताणतणावामुळे आजारपणही. आम्ही जगायचे तरी कसे? ही कैफियत मांडली आहे बेस्ट कामगारांच्या पत्नींनी. कामगारांचे संपूर्ण कुटुंब संपात उतरले आहे. आता माघार नाही; आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. किती दिवस असे तणावात जगायचे, असा सवाल संपकरी कामगारांचे कुटुंबीय करू लागले आहेत. 

मुंबई : पगार वेळेवर मिळत नाही, त्यात महागाईची भर; घरखर्च चालवण्यासाठी कर्ज काढावे लागते. ताणतणावामुळे आजारपणही. आम्ही जगायचे तरी कसे? ही कैफियत मांडली आहे बेस्ट कामगारांच्या पत्नींनी. कामगारांचे संपूर्ण कुटुंब संपात उतरले आहे. आता माघार नाही; आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. किती दिवस असे तणावात जगायचे, असा सवाल संपकरी कामगारांचे कुटुंबीय करू लागले आहेत. 

बेस्ट उपक्रमाच्या 27 आगारांमध्ये कामगारांनी चार दिवसांपासून ठिय्या दिला आहे. थंडीवाऱ्यात आंदोलन करणाऱ्या कामगारांचे चहापाणी आणि जेवणाची व्यवस्था त्यांच्या पत्नींनी उचलली आहे. आगाराजवळच बेस्ट कामगारांच्या वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबांमध्ये बेस्ट प्रशासन, महापालिका आणि राज्य सरकारच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. संप कितीही दिवस चालला, तरी चालू द्या; परंतु एकदाचा सोक्षमोक्ष लावा, अशी भावना ते व्यक्त करत आहेत. 

बेस्ट वसाहतींना आता आंदोलनाच्या छावणीचे रूप आले आहे. महागाईने होरपळणाऱ्या या महिला घरखर्चाचा हिशेब आंदोलनात मांडू लागल्या आहेत. कर्जाने बेजार झालेल्या गृहिणी उसनवारी करून खर्चाची जुळणी करत आहेत. प्रत्येक महिना अधिकाधिक अडचणीचा होत असल्याची कैफियत त्या मांडत आहेत. घरखर्च चालवताना रडकुंडीला आलेल्या महिला पहिल्या दिवसापासून आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. 

महिन्याचा घरखर्च 
गॅस सिलेंडर ः 1000 ते 1500 रुपये 
विजेचे देयक ः 2500 रुपये 
अन्नधान्य ः 5000 रुपये 
भाजीपाला ः 250 रुपये (दररोज) 
शाळेचे शुल्क ः 850 ते 900 रुपये 
क्‍लासची फी ः 2500 रुपये 
शाळेच्या रिक्षाचा खर्च ः 100 रुपये (दररोज) 
वैद्यकीय खर्च ः 1500 रुपये 
दूध ः 22 रुपये (दररोज) 
घरकर्जाचा हप्ता 

पगार वेळेवर मिळत नाही. दर महिन्याला दुसऱ्यांकडून पैसे घेऊन घर चालवावे लागते. महागाईमुळे काटकसर करावी लागते. दागिने गहाण ठेवावे लागले आहेत. या ताणामुळे आजारपण वाढले आहे. 
- मनीषा नलावडे, घाटकोपर 

मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण होत आहे. शाळा आणि क्‍लासची फी भरण्यासाठी उसनवार करावी लागते. महिन्याचा पगार कर्ज फेडण्यात जातो. मुलांची हौस भागवता येत नाही. आई-वडील असल्याचीही लाज वाटते. 
- उषा झेंडे, घाटकोपर 

घर चालवताना मोठी ओढाताण होते. उशिरा मिळणारा पगार पुरत नाही. महिन्याच्या 20 तारखेपर्यंत पगार संपलेला असतो. फॅमिली डॉक्‍टरांकडे, रेशन दुकानदारांकडे उधारी ठेवावी लागते. एकदाचा तोडगा निघाला पाहिजे. आता माघार नाही. 
- सुमय्या पठाण, घाटकोपर

Web Title: ask by Best employees that You tell me how do we live