उल्हासनगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना कार्यालयात मारहाण

दिनेश गोगी
मंगळवार, 2 एप्रिल 2019

प्रभाग समिती तीनचे सहाय्यक आयुक्त आणि उल्हासनगरचे अनधिकृत बांधकाम विभाग प्रमुख गणेश शिंपी यांना एका तक्रारदाराने त्यांच्याच कार्यालयात मारहाण केल्याची घटना घडली. 

उल्हासनगर : प्रभाग समिती तीनचे सहाय्यक आयुक्त आणि उल्हासनगरचे अनधिकृत बांधकाम विभाग प्रमुख गणेश शिंपी यांना एका तक्रारदाराने त्यांच्याच कार्यालयात मारहाण केल्याची घटना घडली. कामगार संघटनांनी व कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर निषेध केला.

सुमारास गणेश शिंपी व लिपिक महेंद्र परब हे शासकीय कामकाज करत असताना तक्रारदार राजेश नागदेव हा कार्यालयात आला. मी अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी दिल्या आहेत. त्याचे काय झाले अशी विचारणा नागदेव यांनी केल्यावर तक्रार माझ्याविरुद्ध केली आहे. मी माझ्याविरोधात केलेल्या अर्जावर चौकशी शकत नाही, असे शिंपी म्हणताच नागदेव याने तक्रारअर्ज शिंपी यांच्या तोंडावर फेकला. मी बघून घेईन, सोडणार नाही, न्यायालयात याचिका दाखल करून नोकरीवरून काढून टाकीन, अशी धमकी देऊन नागदेव याने शिंपी यांची कॉलर पकडून मारहाण केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन नागदेव याला विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. नागदेवला सरकारी अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, उल्हासनगर पालिकेतील कामगार नेते शाम गायकवाड, दिलीप थोरात, दीपक दाभणे आदींनी कर्मचाऱ्यांसोबत प्रवेशद्वारावर गणेश शिंपी यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा निषेध केला. राधाकृष्ण साठे यांनी पेनडाऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. हे आंदोलन स्थगित करून निषेध नोंदवून कामकाज सुरू ठेवण्यात आले.

Web Title: Assistant Commissioner Ganesh Shimpi beaten in Office