डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी सहाय्यक आयुक्त निलंबित

assistant commissioner suspended assistant commissioner suspended from BMC for Dongri building collapsefrom BMC for Dongri building collapse
assistant commissioner suspended assistant commissioner suspended from BMC for Dongri building collapsefrom BMC for Dongri building collapse

मुंबई : डोंगरी येथील केसरबाई इमारतीच्या दुर्घटनेप्रकरणी पालिकेच्या बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विवेक राही यांना निलंबित करण्यात आलं आहे. पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.

धोकादायक इमारतीबाबत तक्रार आली असताना देखील दुर्लक्ष केल्याचा ठपका विवेक राही यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बुधवारी आयुक्तांनी सध्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करता तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला दिला होता. मात्र सध्या कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करत आपण दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नसल्याचा इशारा आयुक्तांनी या कारवाईतून दिला आहे.सध्या विवेक राही यांच्या जागी विनायक विसपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com