उल्हासनगर पालिकेचे सहायक आयुक्त निलंबित

उल्हासनगर पालिकेचे सहायक आयुक्त निलंबित

उल्हासनगर : महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या उद्यानाच्या जागेवर बांधकामाला परवानगी दिल्यामुळे पालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव, कनिष्ठ अभियंता परमेश्‍वर बुडगे आणि शिपाई सुनील केणे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. 
जोखीम आधारित बांधकाम परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिका सुधाकर देशमुख यांनी ही कारवाई केल्याने बेजबाबदार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. काही वर्षांपूर्वीही परमेश्‍वर बुडगे हे बांधकाम परवाने प्रकरणात निलंबित झाले होते. ते अनेक दिवस तुरुंगात होते. उल्हासनगर पालिका मुख्यालयासमोर सेवादास दरबाराजवळ महापालिकेचे उद्यान आहे. या उद्यानाच्या जागेवर एका विकासकाने बनावट कागदपत्रे सादर करून जोखीम आराखडा सादर केला होता. मुख्यालयासमोर उद्यानाच्या जागा असूनही येथे बांधकामासाठी आराखडा मंजूर केला गेला होता. या जागेचा ताबा विकासकाने घेऊन तेथे वृक्षतोड केली. या प्रकरणाची आयुक्त सुधाकर देशमुख यांनी गंभीर दखल दखल घेत, संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली आहे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com