मुंबई : भाजप प्रदेश कार्यालयात अटलजींचे अस्थिकलश दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे अस्थिकलश बुधवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांना हस्तांतरित केला. तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार यांना भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अटलजींचा अस्थी कलश हस्तांतरित केला.

प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे व मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार नवी दिल्ली येथून विमानाने मुंबई येथे अटलजींचा अस्थी कलश घेऊन आले. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कलशांना वंदन करण्यात आले. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, बंदरविकास राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष खा. अमर साबळे व आ. प्रसाद लाड उपस्थित होते.

Web Title: asthikalash of atal bihari vajpayee in bjp mumbai office