व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या ज्योतिष्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

ठाणे : जेम्स ज्वेलरीच्या व्यवसायात नफ्याचे प्रलोभन दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणारा नाशिकचा ज्योतिषी अखेर सात वर्षांनी ठाणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. राजेश भोयल ऊर्फ राजेश आचार्य (52, रा. आंबड, नाशिक) असे या भामट्याचे नाव असून ठाणे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या भामट्या जोतिष्याने ठाण्यातील व्यापारी स्नेहल ऊर्फ राजू चव्हाण आणि भागीदार प्रशांत डावखर व संजय नाईक यांची 2012 मध्ये फसवणूक करून धूम ठोकली होती. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भामटा आचार्य हा ठाण्यातील बाजारपेठेतील प्रभात सिनेमा येथे सुवर्णस्पर्श जेम्स अँड ज्वेलरी या दुकानात ज्योतिषी होता. त्याच इमारतीत चव्हाण यांचा गार्मेंट व्यवसाय होता.

याच ओळखीतून आचार्य याने जेम्सच्या व्यवसायात अधिक नफा असल्याचे भासवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार जानेवारी 2010 ला चव्हाण व भागीदार नाईक यांनी कळवा येथे भाड्याचे दुकान घेऊन लाखो रुपये गुंतवणूक केली. दरम्यान, डावखर यांनीही आचार्य याच्या सांगण्यावरून गुंतवणूक केली होती. त्यानुसार 21 लाख 35 हजार रुपये स्वीकारून 2012 ला आचार्य पसार झाला होता. अखेर सात वर्षांनंतर कळवा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिरीष यादव यांनी या भामट्याला नाशिकमधून जेरबंद केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Astrologer arrested