यंदा गणेशोत्सव केला नाही तरी चालेल; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली महत्वाची माहिती...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

कोरोनाच्या संकटामुळे मागील अनेक वर्षांपासून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मुंबईच्या लालबागचा राजाचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. लालबाग गणेशोत्सव मंडळांने यंदा गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता रक्तदान, आरोग्योत्सव साजरा करणार असल्याचे जाहीर केले.

ठाणे (बातमीदार) :  कोरोनाच्या संकटामुळे मागील अनेक वर्षांपासून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मुंबईच्या लालबागचा राजाचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. लालबाग गणेशोत्सव मंडळांने यंदा गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता रक्तदान, आरोग्योत्सव साजरा करणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान हा निर्णय अतिशय योग्य असल्याचे सांगून यावर्षी गणेशोत्सव साजरा केला नाही तरी चालेल, असा दावा पंचांगकर्ते व खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी केला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ! मुंबईकरांनो हवामान खातं म्हणतंय....

याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, अडचणींमुळे एखाद्यावर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशस्थापना व पूजा करता आली नाही, तरी शास्त्रीय दृष्टीने त्याला दोष देता येणार नाही. परंपरा खंडीत होऊ नये, असे गणेशभक्तांना वाटणे हे साहजिकच आहे. मात्र यंदाची परिस्थिती अडचणीची आहे. तसेच दरवर्षी गणेश चतुर्थीला गणेश स्थापना व पूजा करायलाच हवी, असे कुठल्याही मान्यवर ग्रंथामध्ये लिहीलेले नाही.  

कोरोनावरील सर्वात प्रभावी अशा 'टॉसिलीझुमॅब'चा तुटवडा, परिणाम होंतोय नवी मुंबई ठाण्यातील रुग्णांवर

काळजी महत्त्वाची
देवासाठी श्रद्धा व भक्ती केवळ महत्त्वाची असते. त्यामुळे यंदा कोरोनामुळे प्रवास करणे कठीण असल्याने गर्दी टाळणे खूप आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे आरोग्य असल्याने सर्वांनी शिस्तपालन करणे आवश्यक आहे, असेही सोमण यांनी स्पष्ट केले.

 

यंदा गणेशचतुर्थीच्या दिवशी अडचणींमुळे घरगुती गणेशमूर्तीची स्थापना व पूजा करणे शक्य नसल्यास तसेच गणेशपूजेचे साहित्य उपलब्ध न झाल्यास केवळ अक्षता (तांदूळ) वाहिल्यास तरी चालेल. तसेच देव कधीही कोणावरही कोपत नसतो, तो कृपाळूच असतो. 
-  दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: astrologist d.k.soman says about ganesh festival amid corona outbreak