esakal | अरे वाह! मुंबईच्या 'या' ठिकाणाला मिळणार अटलबिहारी वाजपेयींचं नाव; उर्वरित विस्तारही होणार वेगात
sakal

बोलून बातमी शोधा

sai sports complex

कांदिवली येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे क्रीडासंकुल यापुढे अटलबिहारी वाजपेयी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स या नावाने ओळखले जाणार

अरे वाह! मुंबईच्या 'या' ठिकाणाला मिळणार अटलबिहारी वाजपेयींचं नाव; उर्वरित विस्तारही होणार वेगात

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई: कांदिवली येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे क्रीडासंकुल यापुढे अटलबिहारी वाजपेयी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स या नावाने ओळखले जाणार असून त्याच्या उर्वरित विस्तारकामास आता वेग येईल. त्यामुळे राज्यातील गुणी क्रीडापटूंच्या विकासासाठी त्याचा मोठाच फायदा होईल. 

या संकुलाचे नामकरण स्व. वाजपेयींच्या नावे करावे अशी मागणी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दोन वर्षांपासून लावून धरली होती. मात्र या संकुलाच्या जमिनीचा ताबा कोणाकडे असावा या मुद्यावरून हे नामकरण आणि पुढील विस्तार रखडला होता. त्यामुळे शेट्टी तसेच येथील आमदार अतुल भातखळकर, माजी मंत्री विनोद तावडे यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला. 

हेही वाचा: धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर,  फक्त 'इतकेच' अॅक्टिव्ह रुग्ण

सुमारे 37 एकरांची संकुलाची ही जमीन राज्य सरकारची असल्याने ती आमच्या नावावर करून द्या मग आम्हीच त्याचा विकास करतो, अशी केंद्र सरकारची भूमिका होती. अखेर सर्वांच्या प्रयत्नांनंतर केंद्र व राज्य सरकार अशा दोघांनीही या संकुलाचा विकास आणि विस्तार करायचा असे ठरले. 

मध्यंतरीच्या काळात येथे मोठे बँडमिंटनचे क्रीडांगण झाले, खेळाडूंना राहण्यासाठीच्या होस्टेलची दुरवस्था झाली होती, त्याची दुरुस्ती करण्यात आली. भातखळकर यांच्या प्रयत्नांनी येथील बहुतांश अतिक्रमणे काढण्यात आली, हायवेवरून येथे जाण्यासाठी रस्ता करण्यात आला. आता या संकुलाचा पुढील विस्तारही वेगात होईल, असे शेट्टी यांनी सकाळ ला सांगितले. 

हेही वाचा: "चेस द व्हायरस"! मीरा भाईंदर शहराचा कोरोना नियंत्रणासाठी अॅक्शन प्लॅन तयार

संकुलाची दुरुस्ती आदींसाठी केंद्र सरकार पैसे देत होती. मात्र जमीनमालक असलेल्या राज्य सरकारच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय महापालिका दुरुस्तीला संमती देत नसे. अखेर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अखेर हा प्रश्न सुटला व दोन्ही सरकारांनी एकत्रितरित्या या संकुलाचा विकास आणि विस्तार करण्याचा निर्णय झाला. आता ही प्रक्रिया अधिक वेगवान होऊन क्रीडापटूंना त्याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

atalbihari vajpayees name given to  sai sports complex