बापरे! मालाडमधून तब्बल 'इतके' कोरोना रुग्ण गायब; पोलिसांच्या मदतीने पालिकेची शोध मोहीम.

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

मालाड परिसरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच मालाड परिसरातून ५० ते ६० कोरोना रुग्ण गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबई :मालाड परिसरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच मालाड परिसरातून ५० ते ६० कोरोना रुग्ण गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल नंबर च्या आधारे व पत्ता सापडत नसल्याने अखेर पोलिसांच्या मदतीने या रुग्णांचा शोध घेत असल्याचे मालाडच्या  पी - उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी सांगितले. 

मालाड परिसरातील कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्या रुग्णाचा पत्ता किंवा मोबाइल नंबर घेतला जातो. ५० ते ६० रुग्णांनी  प्रयोगशाळेत कोरोना चाचणी केली होती. परंतु आता या रुग्णांचा मोबाईल नंबर बंद असून पत्ताही चुकीचा दिल्याने शोध लागत नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांना विनंती करण्यात आली आहे. पालिका अधिकारी आणि स्थानिक पोलीस या रुग्णांचा शोध घेत असल्याचे कबरे यांनी सांगितले. 

हेही वाचा: भाजप आमदार आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; विचारला 'हा' महत्वाचा प्रश्न.. 

दरम्यान, मालाड, कांदिवली, गोरेगाव, दहिसर, बोरिवली या भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. तर यात कोरोना रुग्ण गायब झाल्याने पालिका आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. तर लवकरात लवकर या रुग्णांचा शोध न लागल्यास मालाड परिसरात कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची भीती स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे. 

गावी निघून गेले: 

यात स्थालांतरीत कामगारांची संख्या जास्त आहे.हेे कामगार गावी निघून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोरोनाची बाधा झालेल्या एका पालिका कामगारांचाही समावेश आहे. या कर्मचार्याचे नाव या यादीत असले तरी हा कामगार रुग्णालयात दाखल आहे.मात्र,त्यांच्या कुटूंबियांचा शोध लागत नाही.

मोबाईल नंबरही चुकीचे: 

यात झोपडपट्टी मध्ये राहाणार्यांंंंची संख्या जास्त आहे. पोलिस या  लोकांना मोबाईल क्रमांकावरुन ट्रेस करत आहेत.पण काही लोकांचे नंबर ही चुकीचे असल्याचे आढळले. तर काहीनी दिलेल्या पत्त्यातही तफावतआहे.मात्र,पोलिस झोपडपट्ट्यांमधिल पत्ते शोधून काढत आहेत.

हेही वाचा: 'सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करा'; मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश..

1 हजार जणं बेपत्ता:

मालाड मधिल बेपत्ता कोविड बाधितांवरुन भाजपला आयतेच कोलित सापडले आहे. 1 हजारच्या आसपास कोविड बाधित गायब असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाा.यासाठी 1 ते 20 जून या काळात गायब असलेल्या कोविड बाधितांची माहिती जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. 

atleast 60 corona patients are missing from malad  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atleast 60 corona patients are missing from malad