सनातन संस्थेच्या संबंधित वैभव राऊत यांच्या घरी एटीएसची धाड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नालासोपारा : कट्टर हिंदुत्ववादी सनातन संस्थाशी संलग्न असणारे नालासोपार्यातील वैभव राऊत यांच्या घरी महाराष्ट्र्र एटीएसने धाड टाकली. एटीएसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे या धाडीत 8 देशी बॉम्ब मिळाले आहेत. तर घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या दुकानात बॉम्ब बनविण्यासाठी लागणारी सामग्रीही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये गण पावडर आणि डेटोनेटर याठिकाणी  मिळाले आहे. या सामग्रीमध्ये 2 डझनपेक्षा जास्त देशी बॉम्ब बनविले जातात..

कट्टर हिंदुवादी संघटनांशी जोडलेल्या वैभव राऊत यांच्या घरी विस्फोट सामग्री कशासाठी एकत्र केल्या जात होती. हाही यानिमित्ताने एक प्रश्न निर्माण झाला आहे.  

अधिकृत सूत्राकडून एटीएसला माहिती मिळाल्यानंतर मागच्या 3 दिवसांपासून याठिकाणी सापळा रचल्या गेला होता. गुरुवारच्या रात्री पूर्ण खात्री करून वैभव राऊत यांच्या घरी धाड टाकली आहे. याचवेळी वैभवाला त्यांनी ताब्यातही घेतले आहे.  या सर्व कारवाहित एटीएसने कारवाईनंतर  डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम यांनाही बोलावून  तपासणीही करण्यात आली आहे. या कारवाईत मिळालेला पूर्ण मुद्देमाल जप्त करून आपल्या ताब्यात घेतला आहे.

आज रात्रभर एटीएसचे राऊत यांच्या घरी सर्च ओपॅरेशन सुरूच आहे. जे मिळालेले बाँब, त्यासाठी लागणारी सामग्री ही कुठून आणली, हे बॉम्ब कशासाठी बनविले जात होते, याचा सर्व तपास आता सुरू आहे. या नंतरही यात आणखी काय धागेदोरे लागतात हे मात्र पूर्ण तपासानंतरच कळणार आहे..

Web Title: ATS Raided the house of Vaibhav Raut