esakal | खासगी रुग्णालयांबाबत महापौरांची आयुक्तांकडे 'ही' मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

bmc

मुंबईतील दवाखाने, नर्सिंग होम सुरू न केल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी या मागण्या केल्या

खासगी रुग्णालयांबाबत महापौरांची आयुक्तांकडे 'ही' मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील दवाखाने, नर्सिंग होम, पॉलिक्लिनिक महापालिकेशी संलग्न करा आणि डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य द्या, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडे केली आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे बंद असलेली रुग्णालये तत्काळ सुरू करावी; अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

 नक्की वाचा :  कौतुकास्पद ! धकधकता वणवा विझवण्यासाठी दोन तरुणांचं धाडस, वाचा चित्तथरारक अनुभव

मुंबईतील दवाखाने, नर्सिंग होम सुरू न केल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी या मागण्या केल्या. कोविड-१९ चे रुग्ण आढळल्याने जसलोक, भाटिया, सैफी,  बॉम्बे, शुश्रूषा वोक्हार्ट आदी रुग्णालये बंद आहेत. महामारीचे कारण पुढे करत रुग्णालये जाणीवपूर्वक बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे कोविडचे रुग्ण आढळलेली रुग्णालये सॅनिटायझेशन करून पुन्हा सुरू करण्यास भाग पाडावे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. लीलावती, हिंदुजा रुग्णालये सुरू झाली आहेत. त्यामुळे अन्य बंद रुग्णालयेही सुरू करावीत. सेवा न देणाऱ्या मोठ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मोठी बातमी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात

विभागणी करा
खासगी दवाखाने, नर्सिंग होम, पॉलिक्लिनिक महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न करावीत. तेथील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात. कोविड व नॉन-कोविड अशी विभागणी करून या रुग्णालयांत उपचार सुरू करावेत, अशी शिफारस महापौरांनी केली आहे.

Attach private hospitals to the municipality Mayor's demand to the Commissioner

loading image