Mumbai News : महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला; मलंगगड पट्ट्यात 10 तास बत्ती केली गेली गुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Attack on team of Mahavitaran electricity cut off for  10 hours in Malanggad

Mumbai News : महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला; मलंगगड पट्ट्यात 10 तास बत्ती केली गेली गुल

डोंबिवली - कल्याण पूर्वेतील काकडवाल गावात बुधवारी दुपारी मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या भरारी पथकावर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेनंतर महावितरणने मलंगगड पट्ट्यातील वीज पुरवठा बंद केला.

जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मलंगगड भागाचा वीज पुरवठा सुरळीत करणार नाही, असा निश्चय महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केला होता. अखेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत जनतेला भेटीवेठीस धरू नका ! चुकी कोणाची अन शिक्षा कुणाला देत आहेत ?

असा सवाल उपस्थित करत वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. त्यानंतर 10 तासाने या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. कल्याण पूर्व भागात असलेल्या मलंगगड भागात महावितरण ची सर्वाधिक वीज चोरी होत आहे.

वीज चोरीला आळा बसावा यासाठी महावितरण कडून गावागावात वीज मीटरची तपासणी केली जात आहे. वीज चोरीच्या प्रकरणी महावितरण कडून उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शेकडो गुन्हे दाखल आहेत. मात्र असं असतानाही ग्रामीण भागात वीज चोरीचा प्रमाण हे वाढत चालले असल्याने भरारी पथकांद्वारे वीज मीटरची तपासणी केली जात आहे.

ही तपासणी करत असताना काकडवाल गावात महावितरणच्या कार्यकारी अभियंता सह अन्य पाच जणांना जबर मारहाण करण्यात आली त्यामुळे संतापलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दहा तास मलंगगड भाग हा अंधारात ठेवला होता.

त्यामुळे जनतेला वेठीस धरू नका यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती यानंतर बुधवारी रात्री नऊ वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.