पोलिस गोवंडीत गस्त घालत होते! अचानक त्यांच्यावर दगडफेक झाली...

पोलिस गोवंडीत गस्त घालत होते! अचानक त्यांच्यावर दगडफेक झाली...

मुंबई : कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच, गोवंडी आणि शिवाजीनगर भागात पोलिसांवर हल्ल्यांचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणांत चौघांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

कोरोनाचा समूह संसर्ग होऊ नये, यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोवंडीत दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी अधिक कुमक मागवून दोघांना अटक केली असून, अन्य सात जणांचा शोध सुरू आहे. 

शिवाजीनगर परिसरात फिरणाऱ्या काही टवाळ मुलांना पोलिसांनी हटकले. त्या वेळी या टोळक्‍याने पोलिसांना शिवीगाळ व मारहाण सुरू केली. तेथे आणखी पोलिस आल्यावर अनेक जणांनी पळ काढला. या टोळक्‍यातील दोघांना अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Attack on police in Govandi, Shivajinagar area

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com