म्हैस शेतात शिरल्यामुळे महिलेला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

दोघांवर गुन्हा; अद्याप कोणालाही अटक नाही

मुंबई : अलिबाग तालुक्‍यातील सागवाडी येथे म्हैस शेतात शिरल्यामुळे महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गुन्हा दोघांवर दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

सागवाडी येथील जयश्री फसाळा (45) यांची म्हैस समीर पाटील यांच्या शेतात शिरली होती. त्यामुळे पाटील यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. जयश्री फसाळा यांनी भरपाई देण्याची तयारी दाखवली. परंतु, पाटील यांनी शिवीगाळ करून आपल्या डाव्या मनगटावर कोयत्याने वार केला.

मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या आपल्या मुलीलाही समीर पाटील यांचे भाऊ कृष्णा पाटील यांनी मारहाण केली, अशी तक्रार त्यांनी पोलिसांत केली आहे. या दोघांनी आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली, असे जयश्री फसाळा यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानातील क्र. 324, 327, 511, 504, 506, 34 या कलमांनुसार समीर व कृष्णा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on woman in Alibag

टॅग्स