
डोंबिवली : टिटवाळा परिसरातील वडवली गावात एका 29 वर्षीय तरुणावर तिघांनी जीवघेणा हल्ला केला आहे. डोळ्यांत मिरची पावडर टाकत लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कल्याण ग्रामीण टिटवाळा परिसरात तिघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.