पोलिसांबाबत नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

police
police
Updated on

नवी मुंबई : फेसबुकवरुन पोलिसांना झालेल्या मारहाणीचे समर्थन करीत पोलिसांच्या गाडया जाळून टाकण्याची भाषा करणाऱ्या आशिष धारणेविरोधात कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

आशिष धारणे याने पोलिसांप्रती द्वेष निर्माण होईल, अशा प्रकारचे कृत्य केल्याने त्याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  
संपुर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. राज्यामध्ये संचारबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांना काठीचा प्रसाद देखील द्यावा लागत आहे. दरम्यान, नेरुळमध्ये रहाणाऱ्या शैलेश चव्हाण याने गेल्या आठवडयात पुण्यातील कोळेवाडी परिसरात काही समाजकंटकांकडून पोलिसांना झालेल्या मारहाणीचा महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवरील व्हीडीओ नेरुळ नवी मुंबई या फेसबुक पेजवर शेअर केला होता.

फेसबुकवरील हा व्हीडीओ पाहून कळंबोली सेक्टर-8 मध्ये रहाणाऱ्या आशिष धारणे याने  सोमवारी (ता. 27) आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यामध्ये ‘पोलिसांना पकडून चांगला चोप काढला पाहिजे, माझ्या डोक्यात आले तर मी पोलिसांच्या गाडया जाळून टाकेन’, अशा आशयाचा मजकुर टाकून पोलिसांना झालेल्या मारहाणीचे समर्थन केले होते. ही बाब नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाच्या लक्षात येताच त्यांनी धारणेवर कारवाई करण्याच्या सुचना कळंबोली पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Attempts to create hatred among citizens about the police; Action by the police

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com