#COVID19 : घाबरू नका! करोनाला निष्प्रभ करण्यासाठी प्रयत्न सुरू...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

मुंबई : मुंबईतील लासा सुपरजेनेरिक्‍स व इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी (आयसीटी) यांनी कोविड- 19 विषाणूला निष्प्रभ करण्याच्या औषधातील "फेव्हीपिरवीर' हा घटक विकसित करण्यास सुरुवात केली आहे. 
लासा सुपरजेनेरिक्‍सचे अध्यक्ष डॉ. ओंकार हेर्लेकर यांनी नुकतीच ही माहिती दिली.

मुंबईतील लोकल ट्रेनमधील 'इतके' लाख प्रवासी घटले... 

कोविड- 19 विषाणू निष्प्रभ करण्यात "फेव्हीपिरवीर' हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. हा घटक विकसित करून त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. हे उत्पादन लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांची परवानगी मिळवण्यात येईल. त्याआधी जागतिक औषध नियंत्रकाकडून मान्यता मिळवली जाईल. त्यानंतर त्याच्या चाचण्या करण्यात येतील. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर या घटकाचे व्यापारी उत्पादन करण्यासाठी सरकारी मदत किंवा खासगी गुंतवणुकीचे मार्ग अवलंबले जातील, असे त्यांनी सांगितले. 

इथे आपण म्हणतोय वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरु झालंय आणि इथं काय सुरु आहे बघा...

आयसीटीचे प्रा. विकास तेरलवेकर यांनी या प्रयत्नांचे स्वागत केले असून, या घातक विषाणूचा नायनाट करण्यासाठी नवे औषध उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. एबोला, चिकुनगुन्या आदी अन्य घातक आजारांवरील औषधांतही हा घटक असतो. 

Attempts to develop a drug on the corona

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to develop a drug on the corona