इथे आपण म्हणतोय वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरु झालंय आणि इथं काय सुरु आहे बघा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

कळवा : जिल्ह्यात तंबाखु आणि तंबाखुजन्य पदार्थांची विक्री दुकाने त्याचसोबत पानटपऱ्या बंद करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत त्यानुसार कळवा खारेगाव परिसरातील 80 ते 90 पान टपऱ्या गुरुवार पासून बंद आहेत. मात्र, कळवा रेल्वे, स्थानक, शांतीनगर झोपडपट्टी, घोळाई नगर, भास्कर नगर, कळवा शांतीनगर, जयभीम नगर, शिवाजी नगर, विटावा, या परिसरात अनेक ठिकाणी पहाटे पाच पासून चोरट्या व छुप्या पध्दतीने गावठी दारुचे गुत्ते सुरू असल्याने काही ठिकाणी त्यांना पोलिसांकडूनच अभय दिले जात असल्याचे बोलले जाते.

मोठी बातमी - "भोंगा वाजलाय, वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरु" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

"कळवा परिसरात झोपडपट्टी भागात काही ठिकाणी छुप्या पद्धतीने दारूचे गुत्ते सुरू असून येथे अनेक नागरिक गर्दी करतात करोना'च्या पाश्वभूमीवर ते बंद व्हावेत" -रामनारायण प्रजापती, कळवा, रहिवासी  

खाडी किनारी तिवाराच्या झुडपात चोरट्या रीतीने रात्रीच्या सुमारास गावठी दारूच्या भट्ट्या पेटवून प्लास्टिक पिशव्या व फुग्यांच्या वापर करून त्या मधून कळवा मुंब्रा मधील झोपडपट्टी भागात ही दारू आणली जाते. येथे अनेक नागरिक एकत्र येतात सार्वजनिक शांततेचा भंग करतात कधीतरी कारवाई झाली तरी पुन्हा हे गुत्ते बिनधास्तपणे सुरू आहेत. त्यामुळे त्याठिकाणी येणारे गर्दुल्ले तंबाखूजन्य पदार्थ, विड्या ओढत असतात. तसेच त्यांचे थुंकण्याचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे अश्‍या भागात अस्वच्छते बरोबरच थुंकीतुन जीवघेण्या 'करोना'चा संसर्ग होऊ शकतो.

मोठी बातमी -  स्वतःची आई ICU मध्ये तरी आरोग्यमंत्री झटतायत महाराष्ट्रासाठी..

मात्र, सरकारने व पोलिसांनी अजून दारूच्या गुत्त्यावर कडक कारवाई व कडक निर्बंध न आखल्याने हे गुत्त्यावर पहाटे पाच पासून रात्री अकरा पर्यंत लोकांची गर्दी असते त्यामुळे यावर पोलिसांनी छापे मारून कडक कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

covid 19 liquor shops in thane districts are still working from back door

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 liquor shops in thane districts are still working from back door