थकबाकीदारांनो! सात दिवसांत दंड भरा, नाहीतर तुमच्या गाडीचा होणार लिलाव...

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 13 मार्च 2020

महापालिकेने मालमत्ता कर वसूल करण्यासाठी आलिशान वाहने जप्त करण्याचा सपाटाच लावला आहे. गुरुवारी (ता. 12) महापालिकेने 17 महागड्या गाड्या जप्त करून पाच कोटी रुपयांची वसुली केली. मात्र ज्यांनी मालमत्ता कर भरला नाही त्यांच्या वाहनांचा लिलाव सात दिवसांनी करण्यात येणार आहे.

मुंबई : महापालिकेने मालमत्ता कर वसूल करण्यासाठी आलिशान वाहने जप्त करण्याचा सपाटाच लावला आहे. गुरुवारी (ता. 12) महापालिकेने 17 महागड्या गाड्या जप्त करून पाच कोटी रुपयांची वसुली केली. मात्र ज्यांनी मालमत्ता कर भरला नाही त्यांच्या वाहनांचा लिलाव सात दिवसांनी करण्यात येणार आहे. अंधेरी पश्‍चिम भागातील लष्करिया विकासकावर सात दिवसांत दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. 

घृणास्पद ! आपल्या मित्रांना 'त्याने' दिली होती पत्नीचं शरीरसुख घेण्याची परवानगी...

जप्त करण्यात आलेल्या तीन गाड्या वांद्रे पश्‍चिम भागातील विकासक समीर भोजवाणी यांच्या आहेत. अंधेरी पश्‍चिमेतील लष्करिया विकासकाच्या ऑडी व मर्सिडीज कार, साई ग्रुप कंपनीजच्या ऑडी व शेवरले क्रूझ गाड्या आणि वांद्रे पश्‍चिमेतील फेलिक्‍स गेराल्ड ऍण्ड क्‍लारा गृहनिर्माण संस्थेच्या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय भायखळा येथील दर्शन टॉवर, वांद्रे पूर्व येथील शमा बिल्डर्स, कांदिवली येथील नरोज डेव्हलपर्स, माहीम येथील पोपटलाल जमाल, अंधेरी पूर्व परिसरातील चर्मी एंटरप्रायजेझ, ईसीएच सिल्क मिल्स, कुलाबा येथील आत्माराम कांबळी आणि मालाड येथील हॉटेल ग्रीन व्हिला यांची प्रत्येकी एक-एक गाडी जप्त करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या दहशतीमुळे ...ही निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता?

वाहन जप्त होताच कर भरण्यास सुरुवात झाली आहे. फेलिक्‍स गेराल्ड ऍण्ड क्‍लारा यांनी सर्व 65 लाख रुपयांची थकबाकी गाड्या जप्त करताच भरली. शमा बिल्डर्स यांनी 3 कोटी 79 लाखापैकी 1 कोटी 90 लाख रुपये पालिकेकडे जमा केले. नरोज डेव्हलपर्सनेही 1 कोटी 6 लाखापैकी 78 लाख, लष्करिया बिल्डर्सने 80 लाखापैकी रुपये 50 लाख, ईसीएच सिल्क मिल्सने 1 कोटी 90 लाखापैकी 50 लाख रुपये आणि दर्शन टॉवर्सने 72 लाखापैकी 46 लाख भरून आपापल्या गाड्या सोडवून घेतल्या. उर्वरित थकबाकी लवकरच भरण्याची हमीही त्यांनी दिलेली आहे. 

Auction from bmc if no trains leave in seven days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auction from bmc if no trains leave in seven days