Rickshaw Fare Hike: मुंबईकरांनो, रिक्षा प्रवास महागणार? सीएनजी महागल्याने भाडेवाढीसाठी चालकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Mumbai Auto Rickshaw Fare Hike: सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे मुंबईतील रिक्षाचालकांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात प्रतिकिलोमीटर दोन रुपयांची तात्पुरती भाडेवाढ करण्याची मागणी आहे.
Rickshaw Fare Hike

Rickshaw Fare Hike

ESakal

Updated on: 

मुंबई : सीएनजी ७५ दिवसांत साडेपाच रुपयांनी महागल्याने रिक्षाचालकांचा इंधन खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रात प्रतिकिलोमीटर दोन रुपयांची तात्पुरती भाडेवाढ करण्याची मागणी मुंबई रिक्षा मेन्स युनियनने केली आहे. यासंदर्भात युनियनने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन त्यांच्यासमोर भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे.

Loading content, please wait...