अवसरे धरण वाहू लागले

मुसळधार पावसामुळे अवसरे धरण तुडुंब भरले आहे.
मुसळधार पावसामुळे अवसरे धरण तुडुंब भरले आहे.

मुंबई : कर्जत तालुक्‍यात अवसरे येथील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधलेला लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण भरून त्यातील अतिरिक्त पाणी सांडव्याच्या माध्यमातून बाहेर पडू लागले आहे. गेली चार वर्षे धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात येत नसल्याने यंदा शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. 

पाटबंधारे विभागाने अवसरे, बिरडोळे आणि वरई गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून अवसरे हे लघु पाटबंधारे प्रकल्पाचे धरण बांधले. सात गावातील 300 हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या अवसरे लघु पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी धरणाची अनेक वर्षे दुरुस्ती न झाल्याने शेतीसाठीही अपुरे पडू लागले आहे.

अवसरे भागातील शेतकरी वगळता कोदीवले, बिरडोळे, वरई, मानवली, निकोप आणि मोहाली भागातील शेतकरी उन्हाळ्यात भातशेती करत नाहीत. दरवर्षी शेतकरी धरणाच्या दुरुस्तीची मागणी करत असतात. पण पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी आहे. 

गेल्या चार ते पाच वर्षांत अत्यल्प शेतकरी उन्हाळ्यात भातशेती करतात. शेतकऱ्यांच्या 30 हेक्‍टर जमिनीवर अवसरे धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या जलाशयात पाण्याखाली गेलेल्या जमिनीचे केवळ भू-भाडे असून काही शेतकऱ्यांच्या जमिनी या सांडवा, मातीचा बांध आणि कालव्यासाठी वापरल्या जात आहेत. आता शेतकरी आपल्याला त्या जमिनी वापरण्यासाठी मिळाव्यात, अशी मागणी करत आहे. मात्र पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न 
धरणाच्या जलाशयात पाणीसाठा 64 दशलक्ष घनमीटर होत असून मृत साठा वगळता सर्व पाणी शेतीसाठी देण्याचे नियोजन असते. मात्र या भागात एका खासगी जलवाहिनीचे काम करण्यासाठी शेतीसाठी पाणी देणे बंद झाले. ते आजतागायत देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात भातशेती करता येत नाही. या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात शेती केली जायची. त्यामुळे शेतकऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सहज शक्‍य व्हायचे. परंतु पाणी सोडले जात नसल्याने येथील शेतकऱ्यांनी शेती करणेच बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे या वर्षी शेतीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी अवसरे, वरई, बिरदोले, कोदिवले, निकोप, मोहिली येथील शेतकऱ्यांकडून होत आहे. 

शेतकऱ्यांची मागणी असेल तर आम्ही शेतीसाठी पाणी सोडू शकतो. मात्र धरणातून दरवेळी कमी प्रमाणात पाणी सोडत असतो. पण भातशेती केली जाणार असेल तर शेतीच्या आवश्‍यकतेनुसार पाणी सोडण्यात येईल. 
- भरत काटले, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com