अवधूत तटकरे राजकीय धमाका करणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नाराजीबाबत चर्चा केली आहे. त्यांनी मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या सल्ल्यामुळेच थांबलो होतो. शिवसेना-भाजपच्या युतीच्या घोषणेनंतर पुढील निर्णय घेणार आहे. शिवसेनेत विनाअट प्रवेश केला आहे. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये उमेदवारीचा दावा करणार नाही, असे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले. 

कोलाड : राजकारणात कधीही ठरवून काही होत नाही. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. वरिष्ठांच्या सल्ल्यामुळे अनेक महिने धुसफूस रोखून ठेवली, असे स्पष्टीकरण श्रीवर्धचे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी "सकाळ'शी बोलताना दिले. शिवसेना प्रवेश नाट्यानंतर हे स्पष्टीकरण दिले. श्रीवर्धन मतदारसंघात राजकीय धमाका करणार, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नाराजीबाबत चर्चा केली आहे. त्यांनी मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या सल्ल्यामुळेच थांबलो होतो. शिवसेना-भाजपच्या युतीच्या घोषणेनंतर पुढील निर्णय घेणार आहे. शिवसेनेत विनाअट प्रवेश केला आहे. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये उमेदवारीचा दावा करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 
मातोश्रीवर तालुक्‍यातील मातब्बर कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते, याबाबत त्यांनी सांगितले, की रोह्यासह रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीला घरघर लागली आहे. मातोश्रीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते, त्यामुळे गर्दी करता आली नाही. मात्र, आता श्रीवर्धन मतदारसंघात राजकीय धमाका करणार आहे, असा सूचक इशारा त्यांनी दिला; तर काका खासदार तटकरे आणि कुटुंबीयांच्यात कोणता वाद आहे, यावर भाष्य करणे त्यांनी टाळले. विधानसभा निवडणूक प्रचारात वेळ आली तर त्यावर नक्कीच बोलेन, असे त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avdhut Tatkare aggressive in Shrivardhan