esakal | अविनाश ढाकने राज्याचे नवीन परिवहन आयुक्त; तर  शेखर चन्ने एसटीचे नियमीत व्यवस्थापकीय संचालक
sakal

बोलून बातमी शोधा

अविनाश ढाकने राज्याचे नवीन परिवहन आयुक्त; तर  शेखर चन्ने एसटीचे नियमीत व्यवस्थापकीय संचालक

परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांची एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा नियमीत पदभार देण्यात आला आहे.

अविनाश ढाकने राज्याचे नवीन परिवहन आयुक्त; तर  शेखर चन्ने एसटीचे नियमीत व्यवस्थापकीय संचालक

sakal_logo
By
प्रशांत कांबळे


मुंबई  -  परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांची एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा नियमीत पदभार देण्यात आला आहे. तर जळगाव येथील जिल्हाधिकारी अविनाश ढाकने यांना राज्याच्या परिवहन आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हा फेरबदल करण्यात आला आहे. 

सार्वजनिक मालवाहतूकदारांना दिलासा; राज्यसरकारकडून 700 कोटींची करमाफी

यापुर्वी राज्य परिवहन मार्ग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांची बदली झाल्यानंतर त्यांचा प्रभार परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्याकडे सोपविण्यात आला होता. दरम्यान महामारीच्या काळात चन्ने यांनी परिवहन विभाग आणि एसटी महामंडळ या दोन महत्वाच्या विभागांचा यशस्वी कारभार सांभाळला, त्यानंतर आता, चन्ने यांना एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियमीत नियुक्ती देण्यात आली आहे. 

तर परिवहन आयुक्त पदावर जळगांव येथील जिल्हाधिकारी अविनाश ढाकने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी सोलापूर महानगरपालीका आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर जळगांव जिल्हाधिकारी पदावर सुद्धा त्यांनी काम केले आहे. त्यानंतर आता, राज्याच्या परिवहन आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबईकरांनो...पाऊल सांभाळून टाका! कोरोनामुळे रस्ते,पदपथ आणि पुलांच्या दुरूस्तीला कात्री

नव्या आयुक्तांपुढील आव्हाणे
राज्य शासनाच्या एकूण महसूलामध्ये राज्य परिवहन विभागाचा दरवर्षी महसूलाचा वाटा सुमारे 100 कोटीने वाढतो. तर 2016-17 या आर्थीक वर्षात 6819 कोटी रूपयांचा महसुल परिवहन विभागाने मिळवला होता. मात्र, त्यानंतर यामध्ये घट होऊन 2018-19 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2019-20 या आर्थिक वर्षात तब्बल 362 कोटींची घट झाली आहे. त्यामूळे नवीन परिवहन आयुक्तांपुढे परिवहन विभागातील घोटाऴे आणि महसुल वाढविण्याचे आव्हाण पेलावे लागणार आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top