अत्यंत भीषण !  मास्कची कारवाई टाळण्यासाठी ड्रॉयव्हरने घेतला टोकाचा निर्णय, पोलिसांनीही केला फिल्मी पाठलाग

अत्यंत भीषण !  मास्कची कारवाई टाळण्यासाठी ड्रॉयव्हरने घेतला टोकाचा निर्णय, पोलिसांनीही केला फिल्मी पाठलाग

मुंबई, ता. 04 : राज्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्यामुळे पोलिसांना मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यासाठी शिवडी येथे राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेत मास्क न घातल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी पोलिसाच्या अंगावरच ट्रक घातल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. सुदैवाने यात पोलिस शिपाई थोडक्यात बचावला असून पोलिस व्हॅनच्या सहाय्याने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ट्रक चालक व क्लीनरला अटक करण्यात आली आहे. दोघांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार पोलिस शिपाई विठ्ठल मोरे शिवडी पोलिस ठाण्यात कार्यरत असून वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवडी बंदर येथील मुख्य रस्त्यांवर तैनात होते. त्यावेळी विना मास्क जाणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. त्यावेळी गुजरातमधील नोंदणीकृत असलेला एक ट्रक तेथून जात होता. ट्रक चालक आणि क्लिनर दोघांनीही मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी त्यांचा ट्रक अडवला. त्यावेळी चालकाने विचारणा केली असता मास्क न घातल्यामुळे तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून ट्रकच्या खाली उतरण्यास सांगितले.

त्यावेळी दोघांनीही हुज्जत घालायला सुरूवात करून ट्रकमधन खाली उतरण्यास नकार दिला. यावेळी मोरे यांनी ट्रक थांबवण्यास सांगितले असता आरोपींनी त्यांच्या अंगावर ट्रक घालून तेथून पसार झाले.

त्यानंतर मोरे यांनी तात्काळ तेथे गस्तीवर असलेल्या व्हॅन क्रमांक-1ला याबाबतची माहिती दिली व ट्रकच्या क्रमांक सांगितला. त्यानुसार पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून तो थांबवला. त्यावेळी आरोपी बांबू घेऊन खाली उतरले व पोलिसांना मारहाण करू लागले. ट्रक चालक आणि क्लिनर दोघांनाही याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज सैन्द्रे यांनी सांगितले.

मोहम्मद युनुस समशेर आलम (26) व मोहम्मद मैसरदिन मोहम्मद (24) अशी आरोपींची नावे आहेत दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. दोघांविरोधात भादंवि कलम 307, 353, 323, 504, 34 मोटर वाहतुक कायदा 179 (1) अंतर्गत हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्णात करणे, मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.

for avoiding action of police for not wering covid mask truck driver ramped truck on cops

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com