चुकीच्या पद्धतीने मास्क घालाल तर तुम्हाला होऊ शकतात भीषण संसर्गजन्य आजार; कोणते आहेत ते आजार, वाचा

चुकीच्या पद्धतीने मास्क घालाल तर तुम्हाला होऊ शकतात भीषण संसर्गजन्य आजार; कोणते आहेत ते आजार, वाचा

मुंबई, 04 : कोरोना आजाराशी लढण्यासाठी, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात-पाय धुणे व नियमित मास्क लावणे या त्रिसूत्रीचा वापर करणे फार गरजेचे आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने मास्क घालणे, एकच मास्क सलग चार ते पाच दिवस वापरणे, डिस्पोजेबल मास्क परत धुऊन वापरणे, मास्कचा वापर झाल्यावर तो अस्वच्छ ठिकाणी ठेवणे , कुटुंबामध्ये एका व्यक्तीचा मास्क दुसऱ्या व्यक्तीने वापरणे अशा घटना वाढत असून कोरोनासोबतच त्वचारोग व इतर संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञ मांडत आहेत.

वैद्यकीय मास्क सहा ते आठ तासांपर्यंत प्रभावी -

स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक व जेष्ठ फिजिशियन डॉ प्रवीण भुजबळ  यांनी सांगितले की, " योग्य पद्धतीने वापर केलेला वैद्यकीय मास्क हा सहा ते आठ तासांपर्यंत प्रभावी असतो. जर या कालावधी दरम्यान तो ओला झाला तर तो काढून तात्काळ दुसरा मास्क वापरणे गरजेचे असते. तसे न केल्यास नाकाला तसेच ओठाला ऍलर्जी होण्याचा धोका निर्माण होतो व अशा नवीन केसेस वाढत आहेत. अनेक नागरिक एकच मास्क सातत्याने चार ते पाच दिवस घालतात त्यामुळे धाप लागणे, श्वास कोंडणे तसेच इतर संसर्गजन्य आजार बळावण्याची शक्यता 50 टक्क्यांनी वाढते.

मास्कचा वापर करत असताना त्याला हात लावणे टाळा. मास्क गळ्यात लटकवून ठेऊ नये त्यामुळे तुमच्या गळ्याजवळ जमणारा घाम मास्क लावल्यावर नाक व तोंडाद्वारे  परत शरीरात जाऊन इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. सध्या गरमीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी किमान सहा तासांनी किंवा ओला झाल्यानंतर मास्क बदलणे गरजेचे आहे. डिस्पोजेबल मास्कचा वापर पुन्हा करू नये कारण त्याची क्षमता एका कालावधीनंतर संपलेली असते.

डिस्पोजेबल मास्कची योग्य विलेव्हाट लावणे पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून गरजेचे आहे. मास्क काढताना त्याच्या दुषित बाह्य भागाला स्पर्श न करण्याची सर्वाधिक काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. दर चार तासांमध्ये 5 ते 10 मिनिटांसाठी मास्क ब्रेक घेतल्यास आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. परंतु सार्वजनिक ठिकाणी असताना चेहऱ्यावरील मास्क काढू नये; घरी पोहोचल्यानंतरच मास्क काढणे कोरोना संक्रमण काळात  हिताचे ठरेल.

आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेल, धूळ-मातीचे कण तसंच श्वासोच्छवासाद्वारे बाहेर फेकले जाणारे कण इत्यादी मास्कवर जमा होतात त्यामुळे ज्या नागरिकांना श्वसन विकार तसेच हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी डिस्पोजेबल मास्क वापरणे गरजेचे आहे, अशा नागरिकांनी डिस्पोजेबल मास्क सहा ते आठ तासांनी बदलावे अशी माहिती छातिरोग

- फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. जिग्नेश पटेल यांनी दिली. 

 mumbai news wear mask properly otherwise you will get serious viral infections

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com