डिजि ठाणे ॲपला पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

  • पोर्ट ब्लेअर येथे ७ व्या बिझनेस वर्ल्ड ॲवॉर्ड समारंभात सन्मान
  • जी. जी. गोदेपुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ठाणे : इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ठाणे महानगरपालिकेच्या ‘डिजि ठाणे’ला स्मार्ट सिटी मोबाईल ॲप या पुरस्काराने ७ व्या बिझनेस वर्ल्ड स्मार्ट सिटीस ॲण्ड ॲवॉर्ड समारंभात सन्मानित केले. अंदमान निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथील सभारंभात
(ता.२९ ) रोजी डिजि ठाणे ॲपचे कौतुक करण्यात आले. ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वतीने उपकर निर्धारक व संकलक जी. जी. गोदेपुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

७ व्या बिझनेस वर्ल्ड स्मार्ट सिटीस ॲण्ड ॲवॉर्डकरिता नामनिर्देशन मागवण्यात आली होती. यामध्ये विशेष परीक्षकांकडून डीजी ठाणे या डिजिटल प्रणालीला ‘स्मार्ट सिटी मोबाईल ॲप’ विभागात अंदमान निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथील सभारंभात विजयी घोषित करण्यात आले. स्मार्ट सिटीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव केला जातो. भारतातील पहिला डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्प असणाऱ्या डीजी ठाणे या डिजिटल प्रणालीला बिझनेस वर्ल्ड स्मार्ट सिटीज्‌ ॲण्ड ॲवॉर्ड समारंभात सन्मानित केले.

राष्ट्रीय पातळीवर कौतुक
डीजी ठाणेच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. डिजिटल युगात नागरिकांसोबत विविध योजनांच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या ठाणे महापलिकेच्या स्मार्ट सिटीच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान करून कौतुक करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: award to digi thane