esakal | मुलुंड-गोरेगाव रस्त्यासाठी 1200 झाडांवर कुऱ्हाड? पालिकेने हरकती मागवल्या
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंड-गोरेगाव रस्त्यासाठी 1200 झाडांवर कुऱ्हाड? पालिकेने हरकती मागवल्या

मुलुंड-गोरेगाव जोड रस्त्यासाठी 1200 झाडांचा बळी जाण्याची शक्‍यता आहे. यातील 169 झाडे कापण्यात येणार असून, उर्वरित 1024 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहे.

मुलुंड-गोरेगाव रस्त्यासाठी 1200 झाडांवर कुऱ्हाड? पालिकेने हरकती मागवल्या

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : मुलुंड-गोरेगाव जोड रस्त्यासाठी 1200 झाडांचा बळी जाण्याची शक्‍यता आहे. यातील 169 झाडे कापण्यात येणार असून, उर्वरित 1024 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहे. यावर महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सूचना व हरकती मागविल्या होत्या. त्यावर अंतिम निर्णय झाल्यानंतर हे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. पुनर्रोपित केलेली झाडे जगण्याचे प्रमाण मुंबईत नगण्य असल्याने या झाडांचा काही वर्षांनंतर बळीच जाणार आहे. 

हेही वाचा - घटनेला पायदळी तुडवूनच मोदी सरकारचा कारभार; खासदार हुसेन दलवाई यांची टीका

आरे वसाहतीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने रद्द केला. सुरुवातीला मुलुंड-गोरेगाव उन्नत जोड रस्ताही आरे वसाहतीतून जाणार होता; मात्र त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे कापावी लागणार असल्याने पालिका प्रशासनाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला; मात्र यामुळे प्रकल्पाच्या खर्चात किमान तिप्पट वाढ झाली आहे. आता हा प्रकल्प 15 हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. एरोली जंक्‍शन पूर्व द्रुतगती मार्गापासून मुलुंड खिडीपाडापर्यंत 169 झाडे कापण्यात येणार आहेत, तर 1024 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत, अशी 1193 झाडांवर कुऱ्हाड चालण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा - शिवाजी नाट्यमंदिराच्या भाड्यात सवलत मिळावी; मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाची मागणी

यातील 103 झाडे कापणे आणि 279 झाडे पुनर्रोपित करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने जूनमध्ये सूचना व हकरती मागवल्या होत्या; तर 66 झाडे कापणे, 754 झाडांचे पुनर्रोपण यासाठी नोव्हेंबरमध्ये सूचना व हकरती मागविल्या होत्या. ही प्रक्रिया आता संपली आहे. लवकरच प्रशासनाकडून यावर अंतिम निर्णय घेऊन हे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात येतील. 

 Ax on 1200 trees for Mulund Goregaon road The municipality called for objections

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image