..अन् धावती मुंबई क्षणभर थांबली! मुंबईकरांना प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहता यावा यासाठी रेल्वेची खास शक्कल

दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी प्रभू श्रीरामांची अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण देशाने हा क्षण टीव्ही, यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.
Pran Pratishtha Live in Mumbai Local
Pran Pratishtha Live in Mumbai LocaleSakal

Pran Pratishtha Live in Mumbai Local : जगभरातील श्रीरामभक्तांसाठी आज एक ऐतिहासिक दिवस आहे. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी प्रभू श्रीरामांची अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण देशाने हा क्षण टीव्ही, यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या डोळ्यात साठवून ठेवला. कधीही न थांबणाऱ्या मुंबईमधील नागरिकांनी देखील रेल्वे स्थानकावरील स्क्रीनवर हा सुवर्णक्षण पाहिला.

आज या सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली असली, तरी कित्येक खासगी कंपन्यांचे ऑफिस आजही सुरू होते. मुंबईकरांना आपल्या व्यग्र शेड्यूलमधून देखील या सोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला होता. रेल्वेच्या स्टेशनवर उपलब्ध असणाऱ्या मोठ्या स्क्रीनवर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं.

मुंबई सेंट्रल, दादर, अंधेरी आणि एलइडीस्क्रीन उपलब्ध असलेल्या सर्व रेल्वे स्थानकांत या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये रेल्वे स्थानकातील ४० आणि मुंबई लोकलमधील ९६० स्क्रीनचा समावेश होता. यामुळे शुभ मुहूर्ताच्या वेळी रेल्वेमध्ये प्रवास करत असणाऱ्या नागरिकांना देखील या सोहळ्याचा क्षण पाहता आला.

Pran Pratishtha Live in Mumbai Local
PM Modi in Ayodhya: अखेर प्रभू राम आपल्या घरी परतले, प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येतील रामलल्लाचे पहिले रूप

प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

अयोध्येतील रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारच्या शुभ मुहूर्तावर याचा विधी पार पडला. अभिषेक झाल्यानंतर रामलल्लांच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली. यानंतर काही वेळातच आता या सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या व्हीआयपींना या मंदिरात दर्शन घेण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com