मुंबई : आझाद मैदान आणि त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेच्या (Mumbai BMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाने यांत्रिक स्वच्छता मोहीम राबवली आहे. यासाठी ‘स्विपिंग मशीन’च्या मदतीने परिसराची साफसफाई सुरू करण्यात आली आहे..यांत्रिक यंत्रसामग्रीचा वापरया कामासाठी स्किड स्टिअर लोडर (बॉबकॅट) यंत्राचा वापर करून थेट कचरा कॉम्पॅक्टर्समध्ये टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता मोहिमेत दोन मिनी कॉम्पॅक्टर्स आणि एक मोठा कॉम्पॅक्टर तैनात करण्यात आला आहे..स्वच्छतेसाठी मानवी श्रमफक्त यांत्रिकी साधनांवर अवलंबून न राहता, कामगारांच्या मदतीने मैदान आणि परिसरातील घाण, कचरा व इतर अवशेष त्वरित हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच हा परिसर पूर्ववत स्वच्छ आणि सुटसुटीत करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे..आंदोलनामुळे वाढलं महत्त्वदरम्यान, आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून ते अद्याप सुरूच आहे. मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला अधिक वेग देण्यात आला आहे. तसेच उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने यासंबंधी काल सुनावणी घेतली. आज दुपारी ४ पर्यंत आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर सर्व परिसर मोकळा करण्याचे आदेशही दिले आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.