मोदी सरकार म्हणजे भांडवलदारांचं गुलाम, बाळासाहेब थोरातांची केंद्र सरकारवर टीका

मोदी सरकार म्हणजे भांडवलदारांचं गुलाम, बाळासाहेब थोरातांची केंद्र सरकारवर टीका

मुंबईः अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ अखेर काल रात्री मुंबईत पोहोचलं. या मोर्चामध्ये हजारो संख्येनं शेतकरी सहभागी झाले आहेत.  आझाद मैदानातील आजच्या या महारॅलीला संबोधित करण्यासाठी शेतकरी आझाद मैदानात पोहोचले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व्यासपीठावर उपस्थित आहेत. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. आजचं आंदोलन अभूतपूर्व आंदोलन असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. 

आजच आंदोलन अभूतपूर्व आंदोलन असून संपूर्ण देश तुम्हाला पाहतोय. आपण जो पाठिंबा दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देत आहात. तो अभूतपूर्व असा आहे. ते शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांचे हे अभूतपूर्व आंदोलन आहे. एक इतिहास घडवणार आंदोलन आहे, असं थोरात यांनी म्हटलं आहे. 

शेतकऱ्यांसाठी तीन कायदे मोदी सरकरानं पास केले. खासदारांना निलंबित करुन हे कायदे पास करण्यात आले. त्या विरुद्ध पंजाबचे शेतकरी, हरियाणाचे शेतकरी रस्त्यावर उतरले. दिल्लीत कडाक्याची थंडी पडली होती. बर्फासारखी थंडी तिथे पडली आहे. त्या शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा करण्याचं पाप मोदी सरकारनं केलं असल्याची टीकाही बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर केली आहे. उद्या तुम्हाला अभूतपूर्व ट्रॅक्टर रॅली दिल्लीत पाहायला मिळणार आहे. हा शेतकऱ्यांचा एल्गार आहे, असंही ते म्हणालेत. 

आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी या तिन्ही कायद्यांची चर्चा सुरु आहे. हे जे तीन कायदे करण्यात आले.  हे कायदे भांडवलदारांसाठी करण्यासाठी आले आहेत. साठेबाजारांकरिता केलेले आहेत. हे कायदे रद्द झाले पाहिजेत. ही आपल्या सगळ्यांची मागणी आहे. हा आपला एल्गार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

तीन कायदे केलेत. कोणतीही चर्चा न करता हे कायदे करण्यात आलेत. शेतकरी संपवण्याचं काम सुरु आहे. या सरकारनं विमान कंपन्या विकल्या. त्यानंतर विमा कंपनी विकली. बँका विकल्या. रेल्वे विकायला निघाले. त्यासोबतच तुमचा सातबारा विकण्याचं काम हे सरकार करणार आहे हे लक्षात घ्या, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर केली आहे. 

हे सरकार भांडवलदारांचं गुलाम आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हे सरकार प्रतिसाद देत नाही आहे. तुमचा आजचा एल्गार हा देशातल्या शेतकऱ्यांना दिशा देणारा ठरणार आहे. हा तुमचा पाठिंबा शेतकऱ्यांना ताकद देणारा ठरेल. आता जे घडेल ते शेतकऱ्यांचा बाजूने घडणार असल्याचा विश्वासही बाळासाहेब थोरातांनी यावेळी बोलून दाखवला. तसंच महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या बाजूने कायदा पास करु अशी ग्वाही मी देतो, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

Azad Maidan protesting farmers Samyukta Shetkari Kamgar Morcha balasaheb thorat

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com