

Bhim Followers Halt Protest to Let Ambulance Pass, Humanity Prevails in Mumbai
esakal
दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेले भीम अनुयायी सकाळपासूनच मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. तुर्भे येथून रिक्षाने चैत्यभूमीकडे निघालेल्या अनुयायांना सायननंतर पुढे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. परवानगी मिळावी यासाठी अनुयायांनी चुनाभट्टी-सायन कनेक्टरजवळ रस्ता रोखून धरला आणि रास्तारोको आंदोलन सुरू केले.