हातमागावरील वस्त्रांना प्रोत्साहन द्या; बॉलीवूड अभिनेत्रींनी केले महत्वपूर्ण आवाहन

संतोष भिंगार्डे
Saturday, 8 August 2020

1905 मध्ये ब्रिटीश सरकारने बंगालची फाळणी सुरू केली. त्या विरोधात कोलकत्ता टाऊन हॉलमध्ये सुरू केलेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ 7 ऑगस्ट या दिवसाला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

मुंबई : आपल्या देशाला अनेक गोष्टींचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आपल्या देशावर 150 वर्षे इंग्रजांनी राज्य केलं. त्यावेळी त्यांना विरोध करण्यासाठी देशात अनेक चळवळी झाल्या. 1905 मध्ये ब्रिटीश सरकारने बंगालची फाळणी सुरू केली. त्या विरोधात कोलकत्ता टाऊन हॉलमध्ये सुरू केलेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ 7 ऑगस्ट या दिवसाला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

"जर आपण धावू शकत नाही तर आपल्या रक्ताला धावू द्या"; १५ ऑगस्ट रोजी राबवली जाणार अनोखी मोहीम

हातमाग विणकरांच्या योगदानाची आणि परिश्रमांची ओळख व्हावी म्हणून दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो. हेच लक्षात घेऊन प्रियंका चोप्रा, विद्या बालन, कंगना रानौत, जान्हवी कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी स्वत:चे आवडते हातमागाने बनलेले कपडे घालून फोटो ट्विट केले.

उल्हासनगरमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, स्फोटात सात जण होरपळले

प्रियंका चोप्राने तिचा साडीमधला सुंदर फोटो शेअर करत लिहिले, "भारतीय हातमाग हे अद्वितीय कारागिरीचे काम म्हणून ओळखले जाते. वस्त्रोद्योगातील विणकर आणि कारागीर यांना आपला पाठिंबा द्या, हातमागापासून तयार केलेले कपडे वापरा." कंगना रानौत लिहिले की, जेव्हा आपण हँडलूमची निवड करतो तेव्हा आपण आपल्या गरीब विणकरांना दारिद्र्यातून बाहेर येण्यासाठी मदत करत असतो. 

मुंबईकरांनो सावधान ! पुढचा आठवडाभर मुंबईत पुन्हा धुवाधार

शकुंतला देवी फेम अभिनेता विद्या बालन हिनेही राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्ताने कांजीवरम रेशीम साडीत स्वत:चे एक फोटो शेअर केला आणि कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या कठीण काळात भारतीय विणकरांना पाठिंबा देण्याची विनंती केली.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actress requests people to shop and use handloom wardrobe amid national handloom day