मोबाईलच्या अतिवापरामुळे मणका धोक्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई : तासन्‌तास मोबाईलमध्ये डोके खुपसून राहणे तरुणाईसाठी धोकादायक ठरत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांना विशीतच स्पाँडिलायसिस होत आहे. असा आजार ‘टेक्‍स्ट नेक’ वा ‘टेक्‍स्टर्स नेक’ नावाने ओळखला जाते. 

मुंबई : तासन्‌तास मोबाईलमध्ये डोके खुपसून राहणे तरुणाईसाठी धोकादायक ठरत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांना विशीतच स्पाँडिलायसिस होत आहे. असा आजार ‘टेक्‍स्ट नेक’ वा ‘टेक्‍स्टर्स नेक’ नावाने ओळखला जाते. 

पाठीच्या मणक्‍यांमधील कुशनला इजा पोचल्याने किंवा हाड वाढल्यामुळे चाळिशीनंतर अनेकांना स्पाँडिलायसिसचा त्रास जाणवू लागतो. मात्र, मोबाईल,  संगणकाच्या अतिवापरामुळे तरुणांनाही असा आजार होत आहे. आठवड्याला खांदा,मानदुखीने बेजार असलेले सरासरी १०० रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यापैकी २५ रुग्णांना मोबाईलमुळे असे आजार जडलेले असतात, असे अंधेरीतील कोकीळाबेन अंबानी रुग्णालयातील स्पाईन सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. विशाल पेशत्तीवार यांनी सांगितले. मोबाईलचा अतिवापर, संगणकासमोर बसून काम करणे आदी कारणांमुळे तरुणांमध्ये खांदेदुखी वाढत आहे, अशी माहिती ऑर्थोपेडिक विभागाचे स्पाईन सर्जन डॉ. धीरज सोनावणे यांनी दिली.

- १०० रुग्ण आठवड्याला उपचारांसाठी
- 25 रुग्णांना अतिवापरामुळे आजार
- चाळिशीनंतर अनेकांना स्पाँडिलायसिसचा त्रास

सूर्यनमस्कार घाला
रोज व्यायाम केल्यास आणि सूर्यनमस्कार घातल्यास स्पाँडिलायसिसपासून काही अंशी सुटका होऊ शकते, असा सल्ला डॉ. धीरज सोनावणे यांनी दिला. तरुण वयात शस्त्रक्रिया आणि औषधांचा वापर करणे योग्य नाही. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा सल्ला आम्ही देतो, असे स्पाईन सर्जन डॉ. विशाल पेशत्तीवार म्हणाले.

टेक्‍स्ट नेक’वरील उपाय
- मोबाईल डोळ्यांपुढे सरळ रेषेत हाताळा
- मोबाईल अथवा संगणकावर काम करताना ठरावीक वेळाने विश्रांती घ्या
- दर २० ते ३० मिनिटांनी चाला
- अधिक वेळ खालच्या दिशेने बघू नका
- संगणकावर काम करताना 
- खुर्चीवर सरळ बसा

Web Title: backbone will harm due to overuse of mobile phones