मोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

मोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील मुख्याध्यापक एम. सी . नेमाडे यांनी आखला होता. मात्र, येथील ग्रामस्थांनी आपल्या मुलांच्या तक्रारीवरून थेट शाळा गाठत तेथे 200 किलो तांदूळ आणि 24 लिटर गोडे तेलाचा अतिरिक्त साठा सापडवून त्याचा जागेवरच पंचनामा केला आणि त्यांचा डाव उधळून लावला. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शोषण करून मुख्याध्यापक आपलेच पोषण करत असल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला.

मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीचे वर्ग असून 49 विद्यार्थी पटसंख्या आहे. मात्र, येथील मुख्याध्यापक एम. सी. नेमाडे हे विद्यार्थी शासनाने निर्धारित केलेला प्रति विद्यार्थी 150 ग्रॅम तांदळाचा पोषण आहार देत नव्हते. तर कधी हजर विद्याथीॅ जादा दाखवून पोषण आहाराची मलई खाण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार ग्रामस्थ तसेच मोखाडा पंचायत समितीचे सदस्य मधुकर डामसे यांनी हायस्कूलमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, तेथे शिल्लक साठा पुस्तकात केवळ 9 किलो तांदूळ दाखविलेले असताना, प्रत्यक्ष 200 किलो तांदूळ आणि 24 लिटर गोडेतेलाच्या पिशव्या अतिरिक्त आढळल्या आहेत.

या घटनेची माहिती मोखाडा शिक्षण विभागाला दिल्यानंतर अधिकारी आणि ग्रामस्थांनी याचा पंचनामा केला. सदरचा पोषण आहार लपवून, विद्यार्थ्यांना कमी आहार दिला जात असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मोखाडा पंचायत समिती सदस्य मधुकर डामसे व ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना या घटनेविषयी खुलासा देण्याबाबत नोटीस बजावली तर मध्यंतरी शाळेचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे हे पोषण आहाराचे धान्य शिल्लक राहिले असून, आपण ते विद्यार्थ्यांंना वाटप करणार होतो, असे मुख्याध्यापक एम.सी. नेमाडे यांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. 

Web Title: Bad Conditions of schooling food in Mokhada