मुंबई : कांदिवली येथील चारकोप परीसरात पंधरावड्या पासून पिण्याच्या पाण्याला दुर्घंधी

महापालिकेच्या पाणी खात्या मार्फत दुर्घंधीचे कारण शोधले जात आहे.
Mumbai
Mumbaisakal

मुंबई : कांदिवली येथील चारकोप परीसरात पंधरावड्या पासून पिण्याच्या पाण्याला दुर्घंधी येत आहे.त्यामुळे रहिवाशांना बाटलीबंद पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे.महापालिकेच्या पाणी खात्या मार्फत दुर्घंधीचे कारण शोधले जात आहे.

चारकोप येथील सेक्‍टर एक मधील 101 ते 112 क्रमाकांच्या सोसायट्या व आजुबाजूच्या इमारतींमध्ये पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंग देखील काही प्रमाणात बदलला आहे.गेल्या 15 दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे.या प्रकरणी पालिकेत तक्रार केली आहे.असे स्थानिक रहिवाशी सांगतात. पालिकेने जलवाहीनीची तपासणी करण्यासाठी तुलसी हॉटेल तसेच चारकोप मार्केट परिसरात खोदकाम करून दूषित पाण्याचा शिरकाव झाला आहे का याचा शोध घेण्याचे प्रयत्न करत आहे. पाण्याला दुर्घंधी येत असल्याने स्थानिक नागरीक पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर करत आहे.असे भाजपचे कार्यकर्ते योगेश पडवळ यांनी दिली.

Mumbai
बांधिलकी : बचावकार्यात अग्रेसर असणारे सह्याद्री मित्र

चारकोपपरीसरातील सह्याद्री परिसरापासून काही अंतरावर असलेल्या गौरव गार्डन, रॉक ऍव्हेन्यू भागात सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे पाण्याला विचित्र दुर्गंधी येत होती. अनेक दिवसांच्या शोधानंतर हिंदुस्थान नाका भागात जलवाहिनीमध्ये मलनि:सारण वाहिनीतून सांडपाणी शिरत असल्याचे आढळून आले होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com