

Child Trafficking Case In Badlapur
ESakal
ठाणे : मुंबईत महिनाभरापूर्वी शिवाजीनगर-गोवंडी परिसरात नवजात बाळाची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणातील रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईतील नवजात बाळाची विक्री करणारे हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करून ७ दिवसांच्या बाळाला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे.