Mumbai High Court
मुंबई
Badlapur School Crime: शाळेच्या संस्थाचालकासह मुख्याध्यापक अद्यापही फरारच; हायकोर्टानं पोलिसांना झापलं!
बदलापूरमध्ये एका खासगी शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार झाल्यानं राज्यात संतपाचाी लाट आहे.
नवी दिल्ली : बदलापूरच्या एका प्रथितयश शाळेमध्ये दोन साडेतीन वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. पण या प्रकरणातील आरोपी शिक्षण संस्थाचालकासह मुख्याध्यापक अद्याप फरारच आहे.
विशेष म्हणजे त्यांच्यावर बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत अर्थात पॉक्सो अंतर्गत याप्रकरणावर मुंबई हायकोर्टानं दाखल करुन घेतलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी पार पडली. पण यातील आरोपी अद्याप फरारच असल्यानं हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस प्रशासनाला चांगलंच झापलं.