
बदलापूर : बदलापूर पश्चिमेतील गाव परिसरातील जुना तलाव सध्या धोकादायक स्थितीत आहे. पालिकेने काही वर्षांपूर्वी बांधलेला हा तलाव आज अपुऱ्या देखभालीमुळे नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. संरक्षक कठडे नसल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत असून, या भागातील लहान मुलांचे जीव धोक्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.