
Badlapur Latest News: पूर्वेकडील पनवेल रिंग रोड भागात आज दुपारी दीड ते दोनच्या सुमारास अनेक इमारतींना मोठे हादरे जाणवले. हे हादरे एवढे तीव्र स्वरूपाचे होते की, सगळ्यात आधी हे धक्के भूकंपाचे असल्याचे इथल्या रहिवाशांना वाटले.
भयभीत अवस्थेतील रहिवासी हादरा बसल्यानंतर इमारतीबाहेर गोळा झाले होते. दरम्यान, हा हादरा इमारतीच्या पाठीमागील भागात सुरू असलेल्या खाणीत झालेल्या तीव्र स्फोटाचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.