
बदलापूर : मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी सखल भागात साचलेले पाणीदेखील ओसरत आहे. त्यामुळे विस्कळित झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे.