बदलापुरात महिलांच्या अंडाशयाची तस्करी, ३ महिलांना अटक; स्त्री बीज वाढवून IVF सेंटरमध्ये केली जायची विक्री

Badlapur News : बदलापुरात महिलांची सोनोग्राफी करून गर्भाशयातील स्त्री बीज काढून त्याची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन महिलांना अटक करण्यात आल्यानं खळबळ उडालीय.
IVF Centres Linked to Badlapur Egg Trade Probe

IVF Centres Linked to Badlapur Egg Trade Probe

Esakal

Updated on

बदलापुरात महिलांच्या गर्भाशयातील स्त्री बीज तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या गर्भवाशयात स्री बीज वाढवली जायची आणि त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी तीन महिलांना अटक करण्यात आलीय. महिलांची सोनोग्राफी करून त्यांच्या गर्भाशयातील अंडी काढली जात असल्याचं समोर आलं. या प्रकरणी बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योत्सना सावंत यांनी पोलिसात तक्रार केलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com