Badlapur School Crime: बदलापूर प्रकरणात पोलिसांचा भोंगळ कारभार! निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली, नेमकं काय चालंलय?

Badlapur Case: Transfer of Suspended Police Inspector: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकारी निलंबित करण्याचे आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांना २० तारखेला निलंबित करण्यात आले होते.
Suspended police inspector being transferred to Mumbai amidst the ongoing controversy in the Badlapur case.
Suspended police inspector being transferred to Mumbai amidst the ongoing controversy in the Badlapur case.esakal
Updated on

Transfer of Suspended Inspector Sparks Controversy

बदलापूर प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे. ४ वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर अत्याचार केल्याच्या आरोपात आरोपीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तक्रारीचे निराकरण लवकर झाले नाही, आणि पालकांना तक्रार दाखल करण्यासाठी १२ तास पोलीस स्टेशनमध्ये प्रतीक्षा करावी लागली. राजकीय हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला, तर पोलिसांनी या प्रकरणात आळशीपणा केला. लोकांच्या आंदोलनानंतरच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. मुंबई कोर्टानेही पोलिस आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

निलंबित पोलिस निरीक्षकांची बदली-

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकारी निलंबित करण्याचे आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांना २० तारखेला निलंबित करण्यात आले होते. परंतु, निलंबनानंतर फक्त दोन दिवसांत त्यांची मुंबईत बदली करण्यात आली. यामुळे निलंबित झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली कशी होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

राज्य गृह विभागाने आज २२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी केले. यामध्ये शुभदा शितोळे शिंदे यांचे नाव समाविष्ट आहे. यामुळे पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बदलापूर प्रकरणातील निलंबित निरीक्षकांची बदली आणि संबंधित आदेशांनी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Suspended police inspector being transferred to Mumbai amidst the ongoing controversy in the Badlapur case.
Badlapur School Crime Case: "जर शाळाच सुरक्षित नाहीत तर शिक्षण हक्क कायद्यावर बोलून काय उपयोग?"; हायकोर्टानं पोलीस, सरकारला झापलं

कोर्टाचे आदेश-

मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. कोर्टाने राज्य सरकारला कायद्याचे पालन करण्याची आठवण करून दिली आहे. भारतीय न्याय संहितेनुसार, पीडितांच्या जबाबांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आवश्यक आहे, पण या प्रकरणात ते केलेले नाही. लोक रस्त्यावर उतरल्यानंतरच तुम्ही एसआयटी स्थापन करणार का?, असा प्रश्न देखील कोर्टाने सरकारला विचारला. याव्यतिरिक्त, न्यायालयाने राज्य सरकारला २७ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

बदलापूर प्रकरणाने पोलिसांच्या कारभारावर आणि न्यायप्रणालीवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. पोलिसांनी आळशीपणा केला आणि राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल करण्यात आला, हेच सध्याचे चित्र आहे. निलंबित पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन नंतर बदली आणि कोर्टाचे कठोर निर्देश यामुळे या प्रकरणाचे गूढ अजूनही सुटलेले नाही. 

Suspended police inspector being transferred to Mumbai amidst the ongoing controversy in the Badlapur case.
Badlapur Crime : बदलापूरात शाळेतील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातल्या लेकी बाळींसाठी उद्या महाराष्ट्र बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com